
दैनिक स्थैर्य । दि.२३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । लोणंद नगरपंचायतीने प्रस्तावित नवीन सुधारीत घरपट्टी मागे घ्यावी यासाठी लोणंदमधील नागरिक आक्रमक झाले असून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांना व कार्यालयीन अधीक्षक शंकरराव शेळके-पाटील यांना यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच नागरिकांकडूनही निवेदन देण्यात आले.
लोणंद नगरपंचायत यांचे मार्फत विशेष नोटिस सुधारित कर आकारणी याद्वारे प्रचंड संकलीत कर आकारणी केली आहे . या संकलीत कर आकरणीच्या नोटिस लोणंद मधील नागरिकांना देण्यात आल्या आहेत . तसेच लोणंद नगरपंचायतच्या वतीने बांधकाम परवाना फी सुध्दा जास्त आकारणी केली आहे . हा प्रचंड वाढलेला संकलीत कर आणि जास्त बांधकाम परवाना फी आकारणी लोणंदचे नागरिक म्हणून आम्हाला मान्य नाही . सध्याच्या कोरोना महामरीमुळे आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे . या काळामध्ये लोणंद नगरपंचायतीने वाढ केलेला संकलीत कर व वाढ केलेली बांधकाम परवाना फी यांच्या द्वारे लोणंद मधील नागरिकांची आर्थिक लुट लोणंद नगरपंचायत करीत आहे . जर नवीन सुधारीत संकलीत कर आणि बांधकाम परवाना फी रद्द केली नाही तर , लोणंद नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभे करुन आम्ही दि . 26 जानेवारी 2022 रोजी लोणंद नगरपंचायत समोर उपोषणास बसणार असल्याचे रघुनाथ शेळके-पाटील यांनी सांगितले व यासंदर्भात रघुनाथ शेळके-पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा , प्रधान सचिव , नगरविकास विभाग महाराष्ट्र राज्य , साताराचे खासदार वाई, महाबळेश्वर, खंडाळ्याचे आमदार तसेच वाई प्रांत आणि खंडाळा तहसिलदार यांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली असल्याचे सांगितले . त्यावेळी रघुनाथ शेळके सर यांच्यासह शिरीष मेहता , रोहन धायगुडे , सनी दहिवळ, वैभव क्षीरसागर , रामदास केसकर, विशाल शेळके, किशोर पवार, श्रीनाथ शेळके आदी उपस्थित होते .
तर लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनासाठी उपस्थित असलेले श्री दयाभाऊ खरात, विनोद दादा क्षीरसागर, लक्ष्मण तात्या शेळके पाटील, शिवाजीराव शेळके पाटील, हणमंत शेळके पाटील, सागर शेळके पाटील, गजेंद्र मुसळे, गणी भाई कच्छी, शफी भाई इनामदार, विठ्ठल आबा टेंगले, गौरव फाळके, अरुण गालींदे, राजाभाऊ खरात, रोहन धायगुडे पाटील, कृष्णा डोंबाळे, हुजेफ अत्तार हे उपस्थित होते.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाकाळात बहूतेक व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोणंदमधील जनतेला चालू आर्थिक वर्षांत तसेच पुढील आर्थिक वर्षांत सुधारीत घरपट्टी लागू करण्यात येऊ नये व सदर निर्णय दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात यावा यासाठी लोणंद नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांना नागरिकांकडून सह्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारने देखील कोरोना काळात सुधारीत घरपट्टी लागू करू नये असा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर लोणंदमधील नागरिकांनाही दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी लोणंद येथील युवा नेते ड. सर्फराज बागवान, युवा नेते संग्राम शेळके पाटील, रवींद्र डोईफोडे, ,संदीप शेळके,मोहन शेळके, सुनिल बनकर, प्रसाद सुपेकर, रवींद्र धायगुडे,श रद शेळके, विक्रम धायगुडे, इम्रान बागवान, प्रसाद भुंजे, नानासाहेब कोरडकर, दामोदर शेळके आदी नागरिक उपस्थित होते.
लोणंदची कर आकारणी ही नियमांनुसारच आहे. सामान्य नागरीकांवर याचा अतिशय अल्प बोजा पडलेला आहे. मात्र व्यावसायिक वापरातील इमारत तसेच अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींवर शासकीय नियमांनुसार कर आकारणी करण्यात येत आहे. जरी काही नागरीकांच्या यासंदर्भात हरकती असतील तर त्यांनी 16 डिसेंबरपर्यंत नगरपंचायतीत नोंदवाव्यात.
– मुख्याधिकारी हेमंत ढोकले