गेली २०-२५ दिवस राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालेलं असून, उर्वरित निवडणुकांसाठी घासाघाशी चालू आहे. निवडणुका म्हणजे प्रचार सभा, रॅली, यातून टीकाटीपण्णी, विकासाचे मुद्दे, न झालेली कामे, झालेल्या कामाचा श्रेयवाद या गोष्टींवरून उभयतांत खडाजंगी पाहायला मिळत आहे. गेली पाच वर्षांत राज्यात झालेल्या राजकीय घडमोडी पाहता, या शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्र राज्याची राजकीय पातळी कितपत घसरली आहे, हे जाणवतं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर यांच्यातूनच जन्माला आलेले दोन पक्ष शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार), भाजप, काँग्रेससह अनेक लहान-मोठे पक्ष प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष राज्याच्या लोकसभा निवडणूक रिंगणात आहेत. सत्ता वाटपातला लेाोा ाळपर्ळाीा इॅेसअॅरा जुळून येवू न येवू, मात्र सर्व पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी एक लेाोप इॅेसअॅरा जपलेला आहे, तो म्हणजे आपल्या प्रचारामध्ये विकासाच व्हिजन याला दुय्यम स्थान देत भूतकाळातील गोष्टी गिरवणे. २०१४ साली नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष सत्तेत येण्याचं रहस्य होत मोदींनी देशाला दाखवलेलं विकासाच ‘व्हिजन’. मात्र, आता त्यांच्याच आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधातील आघाड्या यांनी एकमेकाच्या भूतकाळातील घटनांना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवलेला आहे.
एकंदरीत महाराष्ट्र राज्य एवढंही प्रगत राष्ट्र नाही की, जिथे विकासकामांबद्दल बोलायला मुद्देच नसावे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर कित्येक वर्ष एका ताटात संसार मांडलेले आज एकमेकाचे शत्रू झालेले आहेत. प्रेमविवाह आणि घटस्फोट असं काहीसं.
राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांवर ठाकरे यांनी किती अन्याय केला हे सांगत आहेत, मुळात फुटीअगोदरच्या शिवसेनेत वरचे जबाबदार मंत्री, सत्तेचा भोग घेणार्यांपैकी एकनाथ शिंदे हे एक प्रमुख होते. तरीही ठाकरे आपल्यावर अन्याय करतात, हे माहीत असूनही ठाकरेंपासून वेगळ व्हायला एवढा काळ का लागला असावा, हा प्रश्न आहे. जिथं अन्याय होतो तिथंं कोण राहील कसं एवढी वर्षे?
उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या पक्षाचे ४० आमदार परस्पर निघून गेले.कित्येक वर्ष सोबत असणारे हे आमदार एका दिवसात तुमच्यासाठी ‘गद्दार’ कसे होवू शकतात, हा प्रश्न आहे? मुळात राज्याच्या मुख्यमंत्री पक्षाचे ५६ पैकी ४० आमदार कानोसा न लागता एक एक करून निघून जातात आणि त्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना कल्पनाही मिळत नाही, हा प्रश्न आहे?
२०१९ ला पहाटेच्या शपथविधीला पवार साहेबांच्या सांगण्यावरून गेलो, त्यानंतर जे काही झालं. त्यामुळे माझी बदनामी झाली आणि याला कारण स्वतः पवार साहेब आहेत, हे आता सांगणार्या अजितदादांनी चार वर्ष मौन का बाळगलं? बदनामी झाली हे आताच का वाटू लागलं? बरं बदनामी होवूनही उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? तुमच्यातला स्वाभिमान जागा होण्यासाठी इतकी वर्ष का लोटावी लागली, हा प्रश्न आहे?
महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री अजितदादा निधी देत नाहीत म्हणून नाराज असणार्या शिवसेना आमदारांना आज अजित पवार किती निधी देतात, हेही मोठं गूढ आहे.सगळीकडेच पक्षाच्या नेत्यांप्रमाणे इतर मंडळींचीही हीच बोंब आहे.
दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला यात किंचितही रस नाही, उलट यातून सत्तेसाठी हापापलेले राजकारणी काय काय करू शकतात, याचा धडा स्वतःच्या तोंडातून स्वतःची उदाहरण ते देत आहेत. आजही जे काही प्रयत्न चालू आहेत, हे कशासाठी हे जनता चांगलं ओळखते.
मागील वर्ष पुष्कळ न पडलेला पाऊस, त्यामुळे उद्भवलेली राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, आर्थिक महागाई, शेतमालाला हमीभाव, निर्यात बंदी, खतांवर आकारला जाणारा कर, पेट्रोल, डिझेल ङझॠ उछॠ गॅस यांच्या वाढलेल्या किंमती, शिक्षण, वाढती बेरोजगारी, ऋेुलेप सारखे गुजरातकडे गेलेले मोठे उद्योग प्रकल्प, सरकारी परीक्षांत होणारे घोळ, उत्तीर्ण उमेदवारांना न मिळालेल्या ऑर्डर, पाणी नियोजन, प्रदूषण, स्वच्छता, आरोग्य, संरक्षण, महिला सक्षमीकरण, ३ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न झालेल्या निवडणुका, आरक्षण, असे कित्येक महत्त्वाचे मुद्दे असताना निवडणूक लढणारे यापासून लांब का राहत आहेत?