साताऱ्यात लॉक डाऊन मध्ये शिथिलता : वर्दळ सुरू अनेक मुख्य रस्ते वाहतूक कोंडीने ग्रासले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २२ : सातारा जिल्ह्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या 201 होऊन आत्तापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तरीही जिल्हा प्रशासनाचे वतीने कलम 144 मधील तर ती तरतुदीनुसार सातारा जिल्हा नोंद रड झोन मध्ये समाविष्ट केलेला आहे त्या अनुषंगाने आज 22 मे शुक्रवारपासून सातारा जिल्ह्यात टाळेबंदी मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. त्यामुळेशहर बस वाहतूक काही प्रमाणात तसेच खासगी रिक्षा व खासगी चारचाकी वाहने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात रस्त्यावर धावली. गेले दोन महिने बंद मध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांनी तर काही काम नसताना वाहतूक सुरू झाली आहे तर गावात चक्कर मारून येऊ या अविर्भावात चारचाकी व दुचाकी वाहने काढून शहरातून सैर मारल्याने अनेक प्रमुख चौकात नागरिकांना वाहतूक कोंडी अनुभवावी लागली.

सुरक्षित शारीरिक अंतर ठेवा. करोना प्रतिबंध उपाय योजना करा ,तोंडाला मास्क बांधा ,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका अशा अनेक सूचना करूनही नागरिक मात्र जणू काही गेले दोन महिने घरात राहिलेला करोना नावाचा पाहुणा गावी निघून गेल्याचे अविर्भावात आपल्या दैनंदिन जगण्यात सुरुवात केली. आणि निश्चितच रस्त्यातील गर्दी पाहता ही शिथीलता रुग्णांच्या संख्येत भर घालण्यास अपायकारक ठरणार नाही ना असेच काहीसे चित्र सध्या सातारा शहरात दिसत आहे .जिल्ह्यांमध्ये covid-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत .सध्या सातारा शहरात राजवाडा, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, मंगळवार पेठ रस्ता गोल मारूती चौक, सोमवार पेठ आदी प्रमुख रस्तेवाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असले तरी नागरिक मात्र या रस्त्यालगत असणार्‍या छोट्या बोळ रस्त्याचा वापर इकडून तिकडे जाण्यासाठी करत असून यावर पहिल्या सारखाच प्रतिबंध करणे गरजेचे वाटते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!