शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२६ | कोल्हापूर |
राज्यातील पात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, आयटीसी प्रक्रियेतील तांत्रिक विलंबामुळे निधी वितरणास उशीर झाला असला, तरी आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कोणत्याही पात्र शेतकर्‍याला कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले, आयटीसी प्रक्रियेतील तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यास विलंब झाला. मात्र आता संबंधित यंत्रणांनी कामाला गती दिली असून आजपासून पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी कोणतोही घाईगडबड करू नये किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!