अयोध्येच्या कार्यक्रमाचे भाजपाच्या वतीने फलटणमध्ये थेट प्रक्षेपण : अशोकराव जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | फलटणकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्या येथे भव्य – दिव्य मंदिर साकारले आहे. त्याची प्राणप्रतिष्ठापना दि. 22 जानेवारी होणार आहे. सदरील अयोध्या येथे होत असणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार मलठण येथे होणार आहे; अशी माहिती फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.

मलठण येथील लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवन मध्ये सोमवार दि. 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता प्रतिमापूजन आयोजित केले आहे. तर 10 वाजता सांप्रदायिक भजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत आयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुपारी 2 ते सायं. 4 वाजेपर्यंत एकतारी भजन व महिला भजनी मंडळाचे भजन संपन्न होणार आहे. सायं. 4 ते 6 वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दीपोत्सव म्हणून फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!