‘फलटण तालुका साहित्यिक सूची’साठी साहित्यिकांनी माहिती पाठवावी

म.सा.प. फलटण शाखेचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहर व तालुक्यातील लेखक, कवी, कादंबरीकार, कथा लेखक यांची माहिती संकलित करून ‘फलटण तालुका साहित्यिक सूची’ महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने प्रकाशित करण्यात येणार असून फलटण शहर व तालुक्यातील साहित्यिकांनी या सूचीमध्ये आपल्या नावाचा समावेश होण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन म.सा.प. फलटण शाखेकडून करण्यात आले आहे.

फलटण शहर व तालुक्यातील साहित्यिकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, प्रकाशित पुस्तकांची नावे, विविध मासिके, वृत्तपत्रे यातून प्रसिद्ध झालेले लेखन ही माहिती म.सा.प. फलटण शाखा कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे (संपर्क क्रमांक : ८३२९४५०४५८) व कार्यवाह ताराचंद्र आवळे (संपर्क क्रमांक : ८३३७२४१३२२) यांचेकडे अथवा शाखा कार्यालय द्वारा ‘लोकजागर’, ३२२, कसबा पेठ, शंकर मार्केट, फलटण या पत्त्यावर दिनांक १७ नोव्हंबर २०२३ पर्यंत पाठवावी. ही साहित्यिक सूची दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच या संमेलनात फलटण तालुक्यातील मराठी साहित्यिकांचे विशेष सत्कार, त्यांच्या प्रकाशित पुस्तकांचे दालन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे साहित्यिकांनी आपली माहिती लवकरात लवकर पाठवावी, असेही आवाहन म.सा.प. फलटण शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!