दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२३ | फलटण |
कोपर्डे, ता. खंडाळा येथे आरंभ व्याख्यानमाला २०२३ चे आयोजन करण्यात आलेले असून ही व्याख्यानमाला शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर ते रविवार दि. १२ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे, अशी माहिती जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष व शिवतपस्वी संभाजी भिडे गुरूजी हे शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता गुंफणार आहेत. ‘प्रतापगड रणसंग्राम’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यान मालेचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील हेलिकॉप्टरमध्ये फिरणारा शेतकरी विलास शिंदे हे ‘शेती नाही तोट्यात’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यावेळी सातार्याचे ‘एसपी’ समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी चांडाळ चौकटीच्या करामती भरत शिंदे (बाळासाहेब) यांचे व्याख्यान माझा जीवनप्रवास यावर होणार आहे. यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (एसीपी) यांची उपस्थिती असणार आहे. कोपर्डे गावाला व्याख्यानाची परंपरा आहे. कोपर्डे गावातील तरुण निर्व्यसनी राहावेत. मोबाईलपासून दूर व्हावा. तसेच गुणवंतांचा कौतुक सोहळा व्हावा, या उद्देशाने कोपर्डे गावात व्याख्यामाला असते. या व्याख्यानमालेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जगन्नाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेले आहे.