कोरोना नियंत्रणासाठी शासनास लायन्स क्लबचे खूप मोठे सहकार्य : डॉ. शिवाजीराव जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थेर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात करोना नियंत्रणासाठी शासन/प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना प्रारंभी करोना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना आणि आता करोना रुग्णांवर उपचार यासाठी प्रयत्नशील असताना लायन्स क्लबचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे गौरवोद्गार इन्सीडंट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केले आहेत.

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल फाऊंडेशन च्यावतीने व मल्टिपल कौन्सिल व्हाईस चेअरमन व माजी प्रांतपाल लायन जितेंद्रभई दोशी यांचे प्रयत्नातून लायन्स डिस्ट्रीक्ट 3234 ऊ1ला र्लेींळव-19 अंतर्गत मिळालेल्या मदतीच्या रकमेतून माळजाई मंदिर येथील कार्यक्रमात  प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांचे हस्ते फलटण येथील कोव्हीड सेंटरसाठी  40 झझए किट, थरमोमीटर व पल्स ऑक्सिमिटर अशी वैद्यकीय सामग्री डॉ. संजय राऊत यांचेकडे सुपूर्त करण्यात आली. अध्यक्षस्थानी फलटण लायन्स क्लब अध्यक्ष प्रमोद जगताप होते. यावेळी लायनेस क्लब प्रेसिडेंट ला. सौ. निलम लोंढे पाटील, फलटण लायन्स क्लब गोल्डनच्या प्रेसिडेंट ला. सौ. उज्वला निंबाळकर, रिजन चेअरमन  ला. बाळासाहेब भोंगळे, डिस्ट्रिक्ट पीआरओ ला. भोजराज नाईक निंबाळकर, ला. मंगेश दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

लायन्स क्लब व अन्य स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटना, सहकारी संस्था, व्यक्ती यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 महिन्यात मोठी मदत केली आहे. तथापी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वैद्यकीय उपचाराला प्राधान्य देताना बाधीत किंवा संशयीत रुग्ण दाखल करण्यासाठी हॉस्पिटल मधील बेड कमी पडत असल्याने अन्यत्र व्यवस्था करण्यात येत असून लायन्स क्लब, सहकारी संस्था, व्यापारी महासंघ व व्यक्तींनी आता याकामी पुढे येऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी व्यक्त केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!