दैनिक स्थैर्य | दि. ४ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा शिक्षण संस्था संचलित निवासी मूकबधिर वसतिगृहाला एक महिन्याचे किराणा वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने गहू, ज्वारी, साखर, तेल डबा, शेंगदाणे, साबण, कोलगेट ब्रश सर्व प्रकारची कडधान्य इत्यादी वस्तूंचा समावेश होता.
याप्रसंगी लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन जगदीश कारवा, लायन्स क्लब फलटणचे सेक्रेटरी महेश साळुंखे, लायन्स नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन लायन मंगेशभाई दोशी, हंगर डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन सौ. नीलम लोंढे-पाटील यांच्या लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन सौ. संध्या फाळके, लायन सौ. मंगल घाडगे लायन सौ. वैशाली चोरमले आदींची उपस्थिती होती.
यावेळी लायन मंगेश दोशी म्हणाले की, यंदाच्या वर्षी लायन्स क्लब फलटणच्या माध्यमातून लायन जगदीश करवा यांनी अनेक अॅक्टिव्हिटी केल्या असून फलटण लायन्स क्लबचे नाव विभागामध्ये अग्रेसर ठेवले आहे. लायन जगदीश करवा यांच्या नेतृत्वाखाली फलटण लायन्स क्लब भविष्यातही अशीच समाजोपयोगी कामे करून समाजातील गरजू, वंचित, उपेक्षित दिव्यांग घटकाला मदत करीत राहील, अशी अपेक्षाही शेवटी लायन मंगेशभाई दोशी यांनी व्यक्त केली.