परदेशी शिक्षणासाठी लेव्हरेज एडुची ५ करोड रुपयांची स्कॉलरशिप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. २३: आगामी शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी लेव्हरेज एडूने आज भारतातील सर्वात मोठी सर्वात मोठी स्टडी अब्रॉड स्कॉलरशिपची घोषणा केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र का आहेत, असे विचारणारा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. यामुळे भारतातील कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थी त्यांची ट्यूशन फी, राहण्याचा खर्चात सवलत मिळवू शकतात. लॅपटॉप जिंकू शकतात, प्रवासातील खर्चात सवलत तसेच कॅम्पसमधील अनेक गोष्टी, जे त्यांच्या स्वप्नांच्या जवळ नेईल, अशा अनेक गोष्टी यात करता येतील. ५ करोड  रुपयांच्या शिष्यवृत्तीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

‘विद्यार्थी-प्रथम प्लॅटफॉर्म या नात्याने, प्रत्येक शक्य त्या मार्गाने विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हा आमचा धर्म आहे. काळानुसार आम्ही, योग्य सल्ला देण्याचे काम वाढवले असून यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या कौशल्यापेक्षा जास्त संधी मिळते. लेव्हरेज एडु स्कॉलरशिप प्रोग्राम हा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करत आहे. तसेच त्यांची ट्यूशन फी कमी करण्यासाठी काही चांगल्या ऑफर आणत आहे. इतरांसाठी ते थेट कॅम्पस खर्चात समाविष्ट केले जातात. या सुविधेमुळे विद्यापीठात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होते’ असे लेव्हरेज एडुचे सह संस्थापक आणि सीईओ अक्षय चतुर्वेदी म्हणाले.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज येत असून दर पंधरवाड्यानंतर विजेत्यांची नावे घोषित केली जातील. परदेशात जाण्याच्या संधीमुळे आपले आणि परिणामी कुटुंबाचे जीवनमान उंचावेल, या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा याद्वारे शोध घेतला जात असून विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांनुसार त्यांचे परीक्षण केले जाईल. शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षक आणि ज्येष्ठ व्यावसायिकांद्वारे विजेत्यांची निवड केली जाईल. ही शिष्यवृत्ती लेव्हरेज एडु प्लॅटफॉर्मवरून अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. अधिक  माहिती https://leverageedu.com/scholarships या संकेतस्थळावर मिळू शकेल.


Back to top button
Don`t copy text!