स्थैर्य, मुंबई, दि.१४: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने तिच्या भावाने स्वतः लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात सुशांतने आपल्या आयुष्यातील 30 वर्षांच्या अनुभवासह जीवनातील वास्तविक खेळाविषयी आपले मत व्यक्त केले होते. श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘भाईने लिहिलेले… खूप सखोल विचार.
सुशांतने लिहिले होते, ‘मला वाटते की मी माझ्या आयुष्यातील 30 वर्षे खर्ची घातली आहेत. पहिली 30 वर्षे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. मला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट व्हायचे होते. मला टेनिस, शाळा आणि ग्रेडमध्ये चांगले व्हायचे होते. आणि मी त्या दृष्टीकोनातून सर्व काही पाहिले. मी जसा आहे तसा ठीक नाहीये. जेव्हा मला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तेव्हा मला कळले की संपूर्ण डावच चुकीचा होता. कारण संपूर्ण डाव जे मी आधीपासूनच होते, ते शोधण्याचा होता.’
7 महिन्यांपूर्वी निधन झाले
सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर सीबीआय, ईडी, एनसीबी, मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला,
पण अभिनेताच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती एक महिना तुरुंगात होती. तर याचप्रकरणात तिचा भाऊ
शोविक चक्रवर्ती हा देखील 3 महिने तुरुंगात राहिला.