मानवतेच्या भावनेतून एकमेकांना सहकार्य करून कोरोनावर मात करू : प्रभाकर घार्गे


 

स्थैर्य, कातरखटाव, दि.२१: कोरोना संसर्गजन्य आजाराने आपले भयानक परिणाम दाखवण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत शहरी भागात असणारा आजार ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहचला आहे. मानवतेच्या भावनेतून एकमेकांनासहकार्य करून या संकटावर मात करू असे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले. 

घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला ११ ऑक्सिजन मशीन प्रदान करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरांगे, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, डॉ बी जे काटकर, प्रा. अर्जुनराव खाडे, सी एम पाटील, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, बाजार समिती सभापती शशिकांत देशमुख, तुकाराम यादव, सुनील गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष शोभा माळी, प्रीती घार्गे, प्रिया घार्गे, आप्पासाहेबगोडसे, जयवंत पाटील, डॉ प्रशांत गोडसे, विपुल गोडसे, राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

घार्गे म्हणाले आजपर्यंत जनतेने दुष्काळी पाणी टंचाई ,भूकंप, वादळ, पूरस्थिती, आदी समस्या पहिल्या. याप्रसंगी चाराछावणी , टँकरने पाणी पुरवठा करून आपण वेगवेगळ्या अडचणींवर मात केली. यापेक्षा कोरोना महामारी अतिशय भयानक आहे. आजार संसर्गजन्य असल्यामुळे माणसे एकमेकांपासून दुरावली जात आहेत. असे न करता प्रत्येकाने एकमेकांना धीर देण्याचे काम केले पाहिजे. कोरोना संदर्भात केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक, तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपआपल्या परीने सहयोग द्यावा. या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा किशोरीताई पाटील, डॉ अशोकराव माने, नगरसेविका सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, संदीप गोडसे, अमोल वाघमारे, जयवंत गोडसे, ईश्वर जाधव, यशवंत घाडगे, नवनाथ वलेकर, डॉ शिवाजी कुंभार, डॉ संतोष मोरे, डॉ सम्राट भादुले आदी सह मान्यवर उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!