स्थैर्य, कोळकी दि. ८ : फलटण शहराचे उपनगर म्हणून झपाट्याने विस्तारत असणार्या कोळकी ग्रामपंचायतीला लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आगामी पाच वर्षात तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत बनवूया, अशी साद कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक यांनी मतदारांना घातली आहे.
कोळकी ग्रामपंचायतीसाठी दि.१५ रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मतदारांशी प्रत्यक्ष गाठी – भेटी सुरु झाल्या आहेत. त्याप्रसंगी तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक हे आपल्या प्रभागातील मतदारांशी संवाद साधत आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेत्तृत्वाखाली कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास सुरु आहे. कोळकी ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेवून या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गावाच्या विकासप्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा. गाव पातळीवरील विविध विकास योजना, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य या सगळ्याच बाबतीत येत्या पाच वर्षात आणखीन प्रभावशील काम करुन कोळकी ग्रामपंचायत तालुक्यात आदर्शवत बनवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी मतदारांची साथ मोलाची आहे असे सांगून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असेही आवाहन तुषार नाईक निंबाळकर, सौ.राधीका पखाले व सौ.तेजश्री मुळीक हे मतदारांना करत आहेत.