जम्बो’बाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेऊ


स्थैर्य,पुणे, दि, ३: शहरासह ग्रामीण भागात करोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेता शिवाजीनगर येथील सीओईपीच्या ग्राऊंडवर उभारलेले जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

करोनाची संख्या कमी झाल्यानंतर दि. 1 जानेवारी 2021 पासून जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. करोना रुग्णांची संख्या तीव्र गतीने कमी होत होती.

तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड रिक्त होते. या पार्श्‍वभूमीवर जम्बो हॉस्पिटल हे तात्पुरते बंद करण्यात आले.

जर करोना रुग्णांची संख्या वाढली तर सात दिवसांच्या आत पुन्हा जम्बो हॉस्पिटल सुरु करण्यात येईल. येथील मशिन, इतर आरोग्य उपकरणे तशीच आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यास जास्त दिवसांचा अवधी लागणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!