बँड-बेंजो व तमाशातील कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करू – मंत्री आमित देशमुख


स्थैर्य, सातारा, दि. 17 : जिल्ह्यातील बँड-बेंजो व तमाशातील कलावंतांना हलाखीचे दिवस आले आहेत. त्यांच्या समस्या मंत्री अमित देशमुख यांच्याकडे काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी मांडल्या. त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

मंत्री आमित देशमुख यांची खंडाळा येथील त्यांच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत तातडीने भेट घेतली. बँड-बेंजो संघटनेची कलावंतांना आर्थिक मदत मिळावी व लग्न सभारंभात ५ ते १० लोकांना वाद्य वाजवण्यास परवानगी मिळावी अशी आग्रहाची मागणी विराज शिंदे यांनी मंत्री महोदयांकडे केली. कारण ५ ते १० लोकांना परवानगी दिल्यास त्या लोकांचा जगण्याचा मार्ग सुकर होईल. आणि त्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न सुटल्यास प्रशासनावरील ताणही हलका होईल. याप्रश्नी लवकरात लवकरात मार्ग काढून बँड-बेंजो व तमाशातील कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री आमित देशमुख यांनी यावेळी दिले.

यावेळी निवेदन देताना सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, वाई चे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार खामकर, खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती गुरुदेव भाऊ बरदाडे, किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, अतुल पवार, प्रमोद अनपट व कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!