अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यान आयोजित : निलेश सोनवलकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, दुधेबावी, दि. ३० : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त युवा व्याख्याते नवनाथ कोलवडकर व रविकुमार ठावरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती, पत्रकार अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख निलेश सोनवलकर यांनी दिली.

प्रतिवर्षी संपूर्ण देशभर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा जयंती उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. याचअनुषंगाने फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानाचे आयोजन करुन अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दि.31 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजता नवनाथ कोलवडकर यांचे व्याख्यान 

निवेदक नवनाथ कोलवडकर या लिंकवर तर याच दिवशी सायंकाळी 6 वाजता रविकुमार ठावरे यांचे व्याख्यान निलेश सोनवलकर या लिंकवरती सर्वांना ऐकता येणार आहे. तरी या अनोख्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निलेश सोनवलकर यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!