विद्या प्रतिष्ठानमध्ये कृषी जैवतंत्रज्ञानवर व्याख्यान संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | बारामती |
विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे दि. २२ ऑगस्ट रोजी ग्रामीण उद्योग जागरूकता विकास योजनेअंतर्गत ‘कृषी जैवतंत्रज्ञान – काळाची गरज’ याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. अशोक पी. गिरी (प्राचार्य शास्त्रज्ञ, एनसीएल पुणे), डॉ. अतुल कुमार मिश्रा (रिसर्च असोसिएट, व्हीएसआय पुणे) आणि श्री. दीपक सरोदे (वरिष्ठ संशोधन सहकारी, व्हीएसआय पुणे) तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरूमठ हे उपस्थित होते.

डॉ. अशोक पी. गिरी यांनी विद्यार्थ्यांना चांगले संशोधक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणाचे बारकाईने निरीक्षणविषयी माहिती देत संशोधनाच्या मूलभूत गरजा, त्याविषयी माहिती गोळा करणे, प्रकल्पाची परिकल्पना, चर्चा करण्याची क्षमता, रेकॉर्ड ठेवणे, परिणाम काहीही असो तो स्वीकारा, याविषयी माहिती दिली. कृषी जैवतंत्रज्ञानातील संशोधनाने सामाजिक समस्या कशा सोडवता येतील, याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. अतुलकुमार मिश्रा यांनी वनस्पती ऊती संवर्धनात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरावे, याविषयी सविस्तर माहिती दिली. दीपक सरोदे यांनी वनस्पती ऊती संवर्धनाचे महत्व आणि त्यामुळे रोगविरहित व चांगल्या प्रतीच्या रोपांचा पुरवठा मोठया प्रमाणावर कसा करू शकतो, याविषयी विचार सांगितले.

प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरूमठ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रोहिणी कोळेकर यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सीमा पाटील यांनी करून दिला. आभार प्रा. शैलजा हरगुडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!