भास्करराव पेरे-पाटील यांचे आज फलटणमध्ये व्याख्यान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२४ | फलटण |
पाटोदा (जि. छत्रपती संभाजीनगर) गावचे माजी सरपंच, प्रसिध्द वक्ते भास्करराव पेरे-पाटील यांचे आज फलटणमध्ये व्याख्यान होणार आहे. श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवात आज, शुक्रवार, दि. १७ मे २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुधोजी हायस्कूल रंगमंच, फलटण येथे पेरे-पाटील यांचे ‘ग्रामविकासाचा आदर्श’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

पाटोदा हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. पाटोदा गावचा कायापालट करण्याचे सर्व श्रेय गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांना जाते. त्यांच्या कारकीर्दीत या गावाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गावाचा सन्मान मिळाला आहे. या गावास भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि राष्ट्रपती-प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

या कार्याबद्दल भास्करराव पेरे-पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थानाकडून ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला आहे.


Back to top button
Don`t copy text!