
दैनिक स्थैर्य । 18 एप्रिल 2025। सातारा । सन 2025 ते 2030 या कालावधीत होणार्या 197 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सरपंच आरक्षण सेाडतीचे आयोजन दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्व.आ.अभयसिंहराजे भोसले सांस्कृतीक भवन शेंद्रे ता.जि.सातारा येथे केले आहे.सदर सरपंच सोडत बैठकीसाठी सर्वश्री.आमदार सातारा,आ.कोरेगाव,मा.आ.259 विधानसभा मतदारसंघ,पचांयत समिती सभापती,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, यांनी स्व.आ.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतीक भवन शेंद्रे,ता.जि.सातारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.