स्थैर्य, सातारा, दि. ८: फलटण येथील कुरेशीनगरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 26 जनावरांची सुटका केली. याप्रकरणी शाहरूख जलील कुरेशी वय 27, रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, कुरेशीनगर, फलटण याठिकाणी कत्तल करण्याकरीता गुरे डांबून ठेवली असल्याची खात्रीशीर खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर कुरेशीनगरात अचानक एलसीबी पथकाने छापा घातला. यावेळी आखरी रस्ता, स्मशानभुमी रोडवर सार्वजनिक जागेत पत्र्याचे शेडमध्ये एकजण संशयीतरित्या उभा होता. पथकातील सपोनि साबळे यांनी त्याची चौकशी केली असता त्याने शेडमध्ये दाटीवाटीने बांधुन ठेवलेली गोवंशीय जातीची मोठी 15 व लहान 11 अशी एकुण 26 जनावरे कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात प्राण्यांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्ह्याचा दाखल केला आहे. तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोउनि भंडारी करत आहेत.
दरम्यान, ताब्यात घेतली जनावरे 1 लाख 64 हजार किंमतीची असून त्यांचे चारा-पाणी व देखभालीच्या दृष्टीने सद्गुरू यशवंतबाबा, गोपालन संस्था झिरपवाडी, ता. फलटण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, यांच्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहा. फौजदार उत्तम दबडे, पो. हवा तानाजी माने, सुधीर बनकर, मोहन नाचण, पोना अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, रविंद्र वाघमारे, वैभव सांवत चालक पोकॉ विजय सावंत तसेच फलटण शहर पोलीस स्टेशन कडील पोउनि विशाल भंडारे, पोउनि बनकर यांनी केली.