
स्थैर्य, सातारा, दि.९: राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली व विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कराडचे तहसिलदार अमरदिप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे उपस्थित होते. यावेळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.