दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । आपल्या गान प्रतिभेने संपूर्ण संगीत जगताला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत दु:खदायी आहे. लतादिदी या भारतीय संगीताचा अजरामर स्वर आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शोक व्यक्त केला आहे.
लतादीदींच्या भावस्पर्शी आवाजाने संगीत रसिकांच्या अनेक पिढ्या न्हाऊन निघाल्या आहेत. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती. यापुढेही दिदींचे रसिकांच्या हृदयातील स्थान अढळ राहील, असेही प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.