फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील साप्ताहिक भूसार बाजारात धान्याची मोठी आवक : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण दि.५: फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या साप्ताहिक भूसार बाजारात धान्याची मोठी आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

ज्वारी आवक ५०७ क्विंटल झाली असून दर प्रति क्विंटल १५०० ते ३९०१ रुपये, बाजरी आवक ९२२ क्विंटल दर प्रति क्विंटल १२०० ते २१०० रुपये, गहु आवक ४९५ क्विंटल दर प्रति क्विंटल १४४० ते २५०० रुपये, हरभरा आवक १०७ क्विंटल दर प्रति क्विंटल ३६०० ते ५७०० रुपये, मका आवक ९२३ क्विंटल दर प्रति क्विंटल १२४० ते १४२५ रुपये, खपली दर प्रति क्विंटल ४५०० ते ५९०० रुपये, मूग आवक १५७ क्विंटल दर प्रति क्विंटल ५००० ते ८५०० रुपये, उडीद आवक १०१ क्विंटल दर प्रति क्विंटल ४००० ते ६५०० रुपये, घेवडा आवक १४३ क्विंटल दर प्रति क्विंटल ३४०० ते ७५०० रुपये, तूर प्रति क्विंटल ४००० ते ४३५० रुपये, चवळी प्रति क्विंटल ४२०० ते ५००० रुपये, भुईमूग शेंग प्रति क्विंटल ४०५० ते ४५०० रुपये प्रमाणे आवक व दर असल्याचे बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव। शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!