दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या दुष्काळी गावातील जमिनी सरकारने संपादीत करून डॅम, तलाव तयार करावेत, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या कु. कांचनकन्होजा खरात यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासन, राज्य सरकारला दिले आहे.
निवेदनात कु. कांचनकन्होजा यांनी म्हटले आहे की, पुणे-बंगळुरू हा महामार्ग सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी सहा तालुक्यांतून जातो. हे सहा तालुके कमी पर्जन्यछायेतील भाग असल्याने येथे सतत दुष्काळ असतो. यावर केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले केले आहे की, ज्या भागातून राष्ट्रीय महामार्ग जाईल त्याच्या शेजारील गावांनी जमीन उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी डॅम, तलाव फुकट तयार करून दिले जातील. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या दुष्काळी गावातील जमिनी योग्य दराने संपादीत करून येथे डॅम व तलाव निर्माण करावेत. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्न काहीअंशी तरी संपुष्टात येईल.