लालासाहेब चव्हाण यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 18 मार्च 2025। फलटण । येथील लालासाहेब मारुती चव्हाण यांचे (वय 75) वृध्दापकाळाने निधन झाले. लालासाहेब चव्हाण हे प्रसिद्ध युवा कवी अविनाश चव्हाण यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक सून आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लालासाहेब चव्हाण यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. लहान वयातच त्यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. मात्र, तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्यापेक्षा लहान व्यक्तींशीही आदराने बोलणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. तारुण्यातील संघर्ष आणि गरिबीच्या झळा कधीही त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य हिरावून घेऊ शकल्या नाहीत. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या छातीवर विठ्ठल-रखुमाईचे गोंदण करून घेतले होते. कर्म हाच धर्म मानून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगले. ते एक निष्ठावान वारकरी होते. तुकाराम बीज या पवित्र दिवशी त्यांनी देह ठेवला.


Back to top button
Don`t copy text!