लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? उदय सामंत यांचे मोठे विधान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचा शब्द सरकार पाळणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले असून, योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 28 नोव्हेंबर : लाडक्या बहिणींना मिळणारे मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते आणि ते आम्ही नक्की पाळणार आहोत, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वाटद (खंडाळा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

योजना सुरूच राहणार असल्याचा विश्वास

लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहील आणि ती कोणीही बंद करू शकत नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. महिलांच्या आरोग्यासाठी हक्काचे पैसे मिळावेत, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

लाभार्थ्यांची संख्या आणि निर्णयाची प्रतीक्षा

केवायसी पडताळणीनंतर राज्यात १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ लाभार्थी महिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २१०० रुपयांची रक्कम योग्य वेळी दिली जाईल असे सामंत यांनी सांगितले असले, तरी प्रत्यक्ष वाढीव हप्ता कधीपासून लागू होणार याबाबतची ठोस तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!