दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड अंतर्गत लॉकडाऊनच्या काळात कृषिकन्या कु. श्रद्धा आनंदराव काळुखे प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना शेतीउपयोगी मोबाईल ॲप्सच्या वापराबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
त्याचबरोबर कृषिकन्या कु. श्रद्धा आनंदराव काळुखे या कृषीकन्येने प्रत्यक्ष कृतीतून बीजप्रक्रिया व त्याचे फायदे, माती परीक्षण का करावे, पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजना, फळझाडाचे कलम कसे करावे, कीड रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांची फवारणी आणि तणनाशकांचा वापर याबाबत माहिती दिली, तसेच प्रात्यक्षिके करून दाखवली.
या उपक्रमासाठी कृषिकन्येला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जाधव सर, कार्यक्रम प्रमुख प्रा. भिलवडे, प्रा. एन. पी. पाटील व इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.