स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेली कृषी कन्या कु.श्रद्धा रविंद्र देशपांडे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत (आरएचडब्ल्युई) सोनगांव, ता. फलटण येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.आमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु.श्रध्दा रविंद्र देशपांडे हिने सोनगांव ता. फलटण येथील मारूती मंदिर या परिसरात पारिजातक, कण्हेर, गुलमोहर यासह फुलझाडांचे वृक्षारोपण करुन ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक पोपट बुरुंगले, उपसरपंच जानार्दन जाधव, तसेच अरविंद देशपांडे, जगन्नाथ नाळे यांच्यासह सोनगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.