कांबळेश्वरमध्ये कृषी कन्या आरती वाघने सादर केली कृषी प्रात्यक्षिके


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर सांगुलवाडी (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) अंतर्गत कृषी अभ्यासक्रमाचा चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कृषिकन्या आरती वाघ हिने येथील किरण कानडे यांच्या शिवारात विविध शेतीविषयक माहिती देऊन कृषी प्रात्यक्षिके उपस्थित शेतकर्‍यांना करून दाखवाली.

उपस्थित शेतकऱ्यांनी कृषिकन्या आरती वाघ हिने दिलेली माहिती व दाखवलेली प्रात्यक्षिके नक्कीच उपयोगी पडेतील अश्या भावना व्यक्त केल्या. यासाठी आरती वाघ हिला प्रा. कदम, प्रा. हावलदार, प्रा. बोटले, प्रा. शिंदे, प्रा. घोरपडे, प्रा. पाताडे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!