
दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२२ । फलटण । श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन धुळदेव येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने धनादेश देण्यात आला आहे.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक संदीप बोरावके यांच्या शुभहस्ते अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रमुख प्राचार्य दिलीप शिंदे यांना धनादेश सुपूर्त करण्यात आला.
यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, राजेंद्र महामुनी, प्रमोद पोतदार, राजेंद्र शिंदे, ॲड. ऋषिकेश काशीद, दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांसाठी भरघोस अशी मदत करण्यात येत असते.