स्थैर्य, फलटण, दि. ०१ : फलटण तालुक्यात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असणाऱ्या क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने कांबळेश्वर गावामध्ये उच्च प्रतीचे मास्क व सॅनिटायझरचे वाटप प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या वेळी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे सहकारी उद्गट्टी, पोपट नरुटे, आप्पासो शेंडगे, कांबळेश्वर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काळे, शामराव भिसे, परशुराम लकडे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रघुनाथ भिसे व मान्यवर उपस्थित होते.
विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे कामकाज सुरु असते. प्रतिष्ठाणची स्थापना झाल्यापासून फलटण शहरासह तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबिविलेले आहेत. आगामी काळामध्ये क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना मदत देण्याचे काम केले जाणार आहे, असेही प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार यांनी स्पष्ट केले.