दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । फलटण । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे, ता. फलटण जि. सातारा या विद्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त शाळेत बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या बाल सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता आठवीतील सिद्धी ठोंबरे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आदरणीय अध्यक्ष श्री ईश्वर गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मराठी, हिंदी, इंग्रजीतून भाषणे केली. श्रेया माळशिकारे, राजवी जाधव, स्वरांजली गायकवाड, श्रावणी कदम, ऋतुजा पवार , आदिती शेडगे, दिया मिंड, श्रेया शिंदे, तनिष्का शिंदे, शिवम थोरात या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
या भाषणातून विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच इयत्ता बारावीतील मानसी जाधव या विद्यार्थिनी ने सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित एकांकिका सादर केली.
सर्व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा पेहराव केल्याने कार्यक्रमाला शोभा आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील सिद्धी पिसाळ हिने केले तर कार्यक्रमाचे आभार तेजस्विनी ठणके हिने मानले.
सूत्रसंचालन ते आभार सर्वच कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून बालिका दिन सादर करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.