दुधेबावीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दुधेबावी तालुका फलटण येथे अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने गोविंद फाउंडेशन च्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला मेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर नवनिर्वाचित सरपंच भावनाताई सोनवलकर, पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर पाटील आदींची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी उपस्थित सर्व महिलांना गोविंद फाउंडेशन च्या वतीने दुग्ध व्यवसाय. संगोपन उत्पादन वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य तसेच गावातील बचत गटाच्या महिला अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!