पाटण येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन


स्थैर्य, 26 मार्च, सातारा : पाटण, जि. सातारा येथे दि. 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळावे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या महोत्सवात शेतकरी, पर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमांचा समावेश आहे. 2 एप्रिलला शाहिरी पोवाडा कार्यक्रम, 3 एप्रिलला भजनी मंडळ कार्यक्रम, 4 एप्रिलला ब्रास बँड पथकाचा थरार . 5 एप्रिलला लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमांबरोबरच आनंदमेळा, बोटींग, घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग, उंट पर्यटकांना अनुभवता येणार आहे. आनंदमेळा, शस्त्र प्रदर्शन, इलेक्ट्रीक बग्गी, कार्निवल परेड, कृषी प्रदर्शन, खाद्यजत्रा, पशु-पक्षी प्रदर्शन सदर महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. त्याचबरोबरीने महोत्सवामध्ये महिला बचत गटांना दालन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महोत्सव मध्ये मनोरंजन विश्वातील कलाकार उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!