उळुंब येथे कोवीड लसीकरण कार्यक्रम संपन्न


स्थैर्य, फलटण दि. ०४: सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयतनांतून मौजे उळुंब, ता. फलटण या ठिकाणी कोविड -19 लसीकरण प्रतिबंधक कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच सौ. कमलताई कळंबे, उपसरपंच गोविंददादा कळंबे, ग्रामसेवक विजय हुंबे उपस्थित होते.

सदर लसीकरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रांजल भोसले, आशा सेविका सौ.सुरेखाताई कळंबे, परिचारिका निलीमा शिंदे, लकडे, अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर, मदतनीस वैशाली भैरट, जाधव, सेवक गौतम कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांना सरपंच सौ.कमलाताई कळंबे, उपसरपंच गोविंददादा कळंबे यांच्यासह ग्रामस्थांनी धन्यवाद दिले.

लसीकरण कार्यक्रमाचा बहुसंख्य ग्रामस्थांनी लाभ घेतला.


Back to top button
Don`t copy text!