दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील मठाचीवाडी येथील कोंडीबा आबा राऊत (वय ८७) यांचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले.
कोंडीबा राऊत यांना ‘भाऊ’ या नावाने ओळखले जात होते. मठाचीवाडी ग्रामपंचायतीचे वीस वर्षे सदस्य तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पाच वर्षे कामकाज त्यांनी केले आहे. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शाखा विस्तरात त्यांचा सहभाग होता. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात तन, मन, धनाने सहभागी होत. शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता.
राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली, एक भाऊ, भावजय, दोन विवाहित पुतणे आणि नातवडे असा परिवार आहे. अंत्यविधीप्रसंगी माण, माळशिरस, इंदापूर, फलटण, बारामती, दौंड आदी भागातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.