
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। फलटण । कोळकी ग्रामपंचायतीचे ८ ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तालुक्याच्या नेतृत्वात तर कोळकी गावामध्ये जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात कोळकी गाव हि भाजपामय करणार असल्याचे मत कामगार नेते बाळासाहेब काशीद यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकी हि कोळकी येथे भाजपा नेते जयकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. त्यावेळी कामगार नेते बाळासाहेब काशीद बोलत होते. यावेळी सतीश शेडगे, संदीप नेवसे, स्वागत काशिद, ॲड. संदीप कांबळे, रणजीत जाधव, सागर चव्हाण, गोरख जाधव, यशवंत जाधव, राजन खिलारे, निरंजन निंबाळकर, मंगेश नाळे, सचिन हजारे, रणजीत काशिद , सागर भोसले, प्रदिप भरते, महेश गायकवाड, राजु जगदाळे, विशाल घोरपडे, विष्णु फडतरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना काशीद म्हणाले कि, कोळकी ग्रामपंचायतीची निवडणूक हि अगदी काही महिन्यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यावेळी कोळकी ग्रामपंचायतीच्यावर जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा कामकाज आम्ही सर्व जण करणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, माजी उपसरपंच विकास नाळे, युवा नेते संजय देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.