कोळकीसाठी ९० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी : रणजितदादा


दैनिक स्थैर्य । दि. 20 जुन 2025 । कोळकी । कोळकी गावाच्या वाढत्या लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्याच्या तुटवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास घोषणा केली आहे. सध्याच्या १५ हजार लोकसंख्येच्या नळ पाणीपुरवठा योजनेला वाढवून, अंदाजे ९० कोटी रुपयांच्या नवीन योजनेला तातडीने मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली.

कोळकी हे फलटण शहराजवळील गाव असून, येथे लोकसंख्या सतत वाढत आहे. २०१५ मध्ये ग्रामपंचायतने सुरू केलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा आधार फक्त १५ हजार लोकसंख्येसाठी तयार करण्यात आला होता. मात्र, आत सुमारे ३० हजार लोक गावात राहत आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा होत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तुटवडीची माहिती भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली; त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली व त्यांनी तातडीने मंजुरी सुद्धा दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळकी गावासाठी त्वरित आणि विशेष लक्ष देत अंदाजे ९० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे. याबाबतच्या बैठकीत, ज्यात प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, २०५४ साली अंदाजे ७३००० लोकसंख्येचा विचार करून नवीन योजना आखण्यात आली आहे.

योजनेंतर्गत साठवण क्षमता असलेला तलाव बांधणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, दाबनलिका, उंच टाकी, वितरण व्यवस्था, सोलर पॅनल व प्रत्येक घरात नळ पाणी पुरविण्याच्या व्यवस्थेचा समावेश आहे. या सुधारणा केल्यास कोळकी गावाची पिण्याची पाण्याची समस्या सुटणार आहे.

कोळकीमध्ये जल्लोष करताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते.

नवीन योजनेच्या घोषणा झाल्यावर कोळकी गावात जल्लोष झाला. फटाकडे वाजवून व जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या हस्ते जिल्हा व राज्यस्तरीय नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी यावेळी गावाच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडणार नाही, असा विश्वास दिला आहे. आमदार सचिन पाटील यांनीही हे आश्वासन पक्के केले असून, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने योजनांचे यथोचित अंमलबजावणीचे काम सुरू आहे.

सदरील योजना मंजूर केल्याबद्दल स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा नेते जयकुमार शिंदे, कामगार नेते बाळासाहेब काशिद, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, युवा उद्योजक सतीश शेडगे, युवा नेते संजय देशमुख, उदयसिंह निंबाळकर, संदिप नेवसे, विकास नाळे, रणजीत जाधव, गोरख जाधव, यशवंत जाधव, सचिन हजारे, किरण जाधव, राजू खिलारे, विष्णु फडतरे, सागर चव्हाण, रोहन शिंदे, गणेश शिंदे, माऊली शिंदे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे विशेष आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!