
कोळकी येथील प्रा. कै. शिवाजीराव दत्तात्रय नाळे यांचे १९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सावडणे (अस्थी विसर्जन) विधी २१ जानेवारीला होणार आहे.
स्थैर्य, कोळकी, दि. 19 जानेवारी : कोळकी येथील प्राध्यापक शिवाजीराव दत्तात्रय नाळे यांचे सोमवार, १९ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नाळे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सावडणे (अस्थी विसर्जन) विधी दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ८.०० वाजता वनदेववशेरी, कोळकी येथे संपन्न होणार आहे. सदर विधीस सर्व आप्तेष्ट व मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.
कै. शिवाजीराव नाळे हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक रणजित शिवाजीराव नाळे यांचे वडील तर कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. अशोक गेनबा नाळे यांचे चुलते होत.
