
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : कोळकी येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी अर्थात खासदार गटाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा आपल्या मूळ गटात, म्हणजेच राजे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश शिंदे यांनी राजे गटात प्रवेश केला. यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, कोळकीतील ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, कोळकी विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र नाळे, उपसरपंच डॉ. अशोक नाळे, अनिल कोरडे, विक्रम पखाले, नवनाथ दंडिले आणि दत्तात्रय नाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.