कोल्हापूर तिरुपती विमान सेवा आजपासून सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोल्हापूर, दि. 01 : कोल्हापूर विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्स व एअरलाइन्स या दोन कंपन्यांच्या कोल्हापूर ते हैदराबाद बेंगलोर व तिरुपती या विमानसेवा सोमवार ता. १ जून पासून सुरू होणार असून ही विमानसेवा पूर्वीच्याच वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो एअरलाइन्स विमानसेवा मागील महिन्यात ऐनवेळी स्थगित करण्यात आली होती. तर आलायंस फक्त हैदराबाद कोल्हापूर ही विमानसेवा नियमित चालू होती.

परंतु दिवसेंदिवस विमान प्रवासासाठी प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून त्यामुळे सर्वच विमानसेवा नेहमीच सुरू होण्याची शक्यता आहे. या विमानसेवेचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच असले तरीही ऐनवेळी त्यामध्ये बदल होऊ शकतो. अशी माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमाल कुमार कटारिया यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर कॉन्टॅक्ट लेस तपासणी व बोर्डिंग पास वितरण प्रणाली, प्रवाशांना कोरोना किटचे वितरण, सोशल डिस्टन्सिंग व स्क्रीनिंग या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!