
स्थैर्य, कोल्हापूर, दि.१६: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना जसे हवे तसे म्हटले तरच त्यांच्यासाठी चांगले, त्यांची चूक दाखवली तर त्यांना खपत नाही. मग पत्रकार पण जेलमध्ये जाणार, कंगना रनौैतचे आॅफिसही तोडले जाणार. त्यांना वाटते नुसती त्यांची स्तुती करावी. पण ग्रामीण भागात याला भाटगिरी म्हणतात. पण, आम्ही भाटगिरी करणारे नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी लगावला.
ते म्हणाले, चूक दाखवली तर महाराष्ट्राची बदनामी होते, मग चुका करू नका. सुशांतसिंह राजपूतप्रकरणी वेळेत एफआयआर दाखल का झाला नाही. तुम्ही एफआयआर दाखल केला नसल्याने सीबीआय चौकशी लागली.