स्थैर्य, सातारा, दि.५: येथील कोडोलीतील जयश्री अभय कल्याणकर (वय ३०) यांनी शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयश्री कल्याणकर यांनी शुक्रवारी दुपारी चार पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कल्याणकर यांना खाली उतरून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणकर यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नसून पोलीस नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत.