मनुष्याच्या निरोगी आयुष्यासाठी असणारी अत्यावश्यक गरज जाणून पुढील ध्येयधोरणेही त्याच पद्धतीची आखली जावीत – सचिन यादव


दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । फलटण । मजबूत मॉनिटरिंग, वेळोवेळी कंपनीशी जोडल्या गेलेल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देऊन स्वतः त्यात झोकून देत अहोरात्र कष्ट करून हाती घेतलेले काम यशस्वी करण्यासंबंधी व कंपनीचे व्हिजन व मिशन ठरवून त्या दिशेने नियोजनपूर्वक पाऊले कशी उचलावीत व येणार्‍या काळाची गरज ओळखून रेसिड्यू फ्री शेती उत्पादनाची व मनुष्याच्या निरोगी आयुष्यासाठी असणारी अत्यावश्यक गरज जाणून पुढील ध्येयधोरणेही त्याच पद्धतीची आखली जावीत यासंबंधी के. बी. एक्सपोर्टस् इंटरनॅशनल प्रा. लि. व के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लिमिटेडचे डायरेक्टर सचिन यादव यांनी सखोल माहिती देत, एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्यामध्ये इनोवेशन कशा प्रकारचे असावे या विषयावर मार्गदर्शन केले.

एसआयआयएलसीच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या 2022 – 23 बॅचला सचिन यादव यांनी मार्गदर्शन केले.

सचिन यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी एमसीईआरचे डायरेक्टर डॉ. हरिहर कौसडीकर, एसआयआयएलसी पीजी ई लर्निंगचे सीईओ निनाद पानसे, असिस्टंट मॅनेजर अमोल बिरारी, बिझनेस हेड अंकित माहेश्वरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!