दैनिक स्थैर्य । दि. २९ जून 2021 । फलटण । माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा फलटण तालुका उपाध्यक्षपदी सासवड ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा फलटण तालुका अध्यक्ष नानासो इवरे यांनी सदर निवडीचे पत्र त्यांना दिले.
येथील सावतामाळी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ नेते डॉ.विजयराव बोरावके, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, अनुसूचित जाती-जमाती तालुका अध्यक्ष राजेंद्र काकडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, मार्केट कमिटी माजी संचालक सिराज शेख, महाराष्ट्र राज्य माळी महासंघ तालुका अध्यक्ष बाळासाहेब ननावरे, नगरसेवक सचिन अहिवळे, कामगार संघटना तालुका अध्यक्ष बाळासाहेब काशीद, माजी पंचायत समिती सदस्य सतीश वावरे, भटक्या विमुक्त जाती-जमाती तालुका अध्यक्ष सुनील जाधव, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सागर अभंग, युवा नेते अमित रणवरे, तालुका उपाध्यक्ष अमोल बोडके, विकास लोखंडे, सुधिर करळे, वसीम इनामदार, विशाल नलवडे, आबा शिंदे, माऊली नाळे, विशाल बोबडे, रामचंद्र नरूटे, दादा कोकरे, हनुमंत बासर, विक्रांत झणझणे, अॅड. जयंत काकडे, संजीव झणझणे, सचिन पवार आदींसह भाजपचे कार्यकर्ते, सासवड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
किरण जाधव यांनी विविध उपक्रम राबवुन सामाजिक कार्य केले आहे. कोरोना काळात अनेकांना बेड व औषधे उपलब्ध करून दिले आहे. कृषी पदवीधर आणि शेतकरी यांच्यासाठी त्यांनी बहुमोल कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपा युवा मोर्चा संघटनेत काम करण्याची त्यांना संधी देऊन त्यांच्या हातून युवकांसाठी असेच समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आणखी बळ दिले आहे.