खटाव तालुका भाजपच्या वतीने धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी आंदोलन


 

स्थैर्य, खटाव, दि. : भारतीय जनता पक्षाच्या राज्यभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका व वडूज शहर भाजपा तर्फे शनिवारी आंदोलन करण्यात आले. 

भारत व महाराष्ट्र मधील सर्व जाती धर्माची प्रार्थना स्थळे खुली केली जावीत यामध्ये मंदिर, मस्जिद, आदी सर्व धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळे आदींचा समावेश आहे.वडूज येथील श्री सिद्धिविनायक मंदिर समोर या मागणीचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी भा. ज पा. जिन्दाबाद. .जैन मंदिरे. .मशिद..बौद्ध प्रार्थना केंद्रे सुरू करा

हिंदू मंदिरे खुली करण्याची मागणी करुन वडूज पोलीस स्टेशन चे पोलीस श्री देवकर व सहकारी यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी तालुका अध्यक्ष विकल्प शहा,भाजपचे जिल्हा सचिवअनिल माळी,जयवंत पाटील वडूज शहर अध्यक्ष प्रदिप शेटे, इकबाल मुल्ला, अमर जाधव. अजय शेटे, रवी पेठे, विवेक येवले, गोरख, सिकंदर मुल्ला, काळे..मिस्त्री आदींची उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!