दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । खटाव । पडळ ता.खटाव येथाल खटाव माण साखर कारखान्याचा ४ था गळीत हंगाम आज कारखाना कार्य स्थळावर कराड अर्बन बँक प्रमुख मा. श्री. सुभाषराव जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी चेअरमन मा.आ. प्रभाकर घार्गे, को चेअरमन मा.मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक मा. संग्रामबापु घोरपडे, मा.डॉ. सुभाष एरम, मा.समीर जोशी, मा.दिलीप गुरव, कराड अर्बन बँक महाव्यवस्थापक मा.गिरीश सिंहासने, मा.आ.डॉ.दिलीप येळगावकर, मा.रामकृष्ण वेताळ, मा.सुरेश कुंभार, मा.महेशबाबा जाधव, मा.सुरेशतात्या पाटील, मा.चंद्रकांत पाटील, मा.शंकरराव शेजवळ, मा.विकासआण्णा गायकवाड, मा.प्रमोदआप्पा गायकवाड, मा.रणजीत माने, मा.लिंबाजी सावंत, मा.दादासो थोरात, मा.गणेश जाधव, मा.सुनिल देशमुख, मा.नेताजी भोसले, मा.हरीश पाटील, मा.संतोष पाटील आदी प्रमुख पदाधिकारी व नेतेमंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी चालु गळीत हंगामात ९ लाख गाळपाचे उदीष्ठ ठेवले असुन चालु गळीत हंगामात २७०० रु दर देण्याचे जाहीर करण्यात आले असून सभासद व शेतकऱ्यांना टनेजची साखर दिवाळीला देण्यात येणार आहे. तसेच कामगारांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. यावेळी मा. इंदिरा घार्गे, मा. प्रिती घार्गे, मा.महेश घार्गे, मा.कृष्णत शेडगे, मा.मंगलताई घोरपडे, मा.समता घोरपडे, मा.विक्रम घोरपडे, सर्व संचालक, शेतकरी, कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.