स्थैर्य, फलटण दि.१६: 18 मार्च 1733 रोजी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या आदेशाने शाहु महाराजांच्या एकनिष्ठ विश्वास सरदार खंडेराव बर्गे यांनी रायगड किल्ला दुश्मनांच्या हातुन स्वराजात सामील केला. या 18 मार्च 1733 रोजीच्या रायगड लढाईचे औचित्य साधून सरदार बर्गे मंडळींच्यावतीने दरवर्षी 18 मार्च रोजी सरदार बर्गे घराण्यातील शूरवीर पराक्रमी राजश्री सरदार खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमाचा ‘खंडेराव शौर्यदिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे, सुलतानजी बर्गे यांचे वंशज दिनेशअप्पा बर्गे यांनी सांगीतले. कोरेगाव (जि.सातारा) येथील श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने सुलतानवाडी,(शौर्य भूमी), कोरेगाव येथे ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, ‘ऐतिहासिक कोरेगाव’ या ग्रंथाचे लेखक व राजश्री श्रीमंत हरजीराजे बर्गे सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंगदादा सुतार, राजश्री सरदार सुलतानजी बर्गे यांचे वंशज दिनेशअप्पा बर्गे, चंद्रशेखर बर्गे, युवराज आप्पा बर्गे, बिपीन फाळके, नगरसेवक राहुल बर्गे, सुरेश बर्गे, सुलतानवाडीचे उपसरपंच सुनिल बर्गे, तडवळे येथील इतिहास अभ्यासक राहुल भोईटे, ललगुण येथील अमीत फाळके, काटेवाडी येथील कुलदीप काटे, फलटण येथील श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानचे सदस्य व इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे, बारामती येथील अॅड.विशाल बर्गे, शिंदेवाडी, ता.फलटण येथील इतिहास अभ्यासक सचिन भगत, राजश्री श्रीमंत हरजीराजे बर्गे सरकार प्रतिष्ठान घराण्यातील जेष्ठ सल्लागार मंडळी शहाजीकाका बर्गे, गजाननभाऊ बर्गे, युवराज आप्पा बर्गे पाटील, उदयसिंह बर्गे, नगरसेवक सुनीलदादा बर्गे, श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान शिवजयंती रथयात्रेचे पुणे,समितीचे कोरकमिटी सदस्य प्रणवजी बर्गे, श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कोरेगावचे सदस्य शंकरराव बर्गे, सोमनाथ बर्गे, धर्मराज बर्गे, ग्रामसेवक निलेश बर्गे यांची उपस्थिती होती.
दिनेशआप्पा बर्गे पुढे म्हणाले की, बर्गे घराण्यातील शुरयौध्दे यांनी हिंदवी स्वराज्य संस्थांमध्ये मोलाचा मोठा वाटा उचलला आहे. या नियोजित शौर्यदिनाच्या निमित्ताने बर्गे घराण्यातील या शुरवीरांच्या कार्याला उजाळा मिळेल. या निमित्ताने काही कारणास्तव बाहेर गावीअसलेले वर्षानुवर्षे व्यवसायानिमित्ताने लांब असलेली सर्व बर्गे मंडळी एकत्रित एक दिवस येतील व आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवंश व आपल्या पूर्वजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमिचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळेल. दिनेशआप्पा बर्गे यांनी मांडलेल्या या विचाराला तात्काळ सर्व उपस्थितांनी संमती देवून येत्या 18 मार्च रोजी ‘सरदार खंडेराव शौर्यदिन’ साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले.
चंद्रशेखर बर्गे यांनी आपल्या मार्गदर्शनात पानिपतच्या रणसंग्रामाविषयी सविस्तर माहिती देवून या लढाईत बर्गे घराण्यातील शूर मंडळींनीही भाग घेतला होता असे सांगीतले.
प्रारंभी पोपटराव बर्गे व अॅड.विशाल बर्गे यांच्या हस्ते राजश्री सरदार सुलतानजी बर्गे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक नाणी अभ्यासक, सचिन भगत यांना त्यांनी राजा शिवछत्रपती युवक संघ व प्रतापगड उत्सव समिती वाई -फलटण यांच्या माध्यमातून गोरक्षण, व्यसनमुक्ती,किल्ले संवर्धन, नाणी अभ्यास आणि संग्रह यात करत असलेल्या योगदानाबद्दल श्रीमंत राजश्री हरजीराजे बर्गे सरकार प्रतिष्ठानच्यावतीने नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल,नारळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.