दैनिक स्थैर्य । दि. ०९ एप्रिल २०२३ । बारामती । ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात अनुभवी असल्याने त्यांच्या विचारांचा आदर करा व तो ठेवा अनमोल आहे पुढील पिढीस मार्गदर्शक ठरल्याने पुढील पिढीचे जीवन सकारत्मक व सुकर होण्यास मदत होईल असे प्रतिपादन किर्लोस्कर फेरर्स, आय एस एम टी कंपनीचे प्लांट हेड किशोर भापकर यांनी केले.
बोरावके वृद्धाश्रम तांदूळवाडी येथे किशोर भापकर यांच्या वाढीवसानिमित फ्रीज भेट देऊन व ‘आम्ही ज्येष्ठ विचारांची सेवा करू श्रेष्ठ’ या कार्यक्रमात किशोर भापकर बोलत होते. या वेळी बोरावके ज्येष्ठ नागरिक निवास चे विश्वस्त किशोर मेहता, अभय शहा, डॉ अजित अंबर्डेकर,व व्यवस्थापक गणेश शेळके आणि किर्लोस्कर फेरर्स चे असोसिएट उपाध्यक्ष अभिजित जगताप, कार्यकारी अभियंता शैलेश यादव, सौमित्र ठोंबरे, अमोल थोरात, सुजित बर्गे, विजय खोमणे, व आय एस एमटी सोसायटी चे चेअरमन सुधीर भापकर ,व्हाईस चेअरमन पांडुरंग दिवेकर व आदी मान्यवर,ज्येष्ठ नागरिक उपस्तीत होते .
या वेळी सुवर्णा घम, शरद गांधी, गणेश शेळके ,सुधीर जोशी ,किशोर मेहता, अभय शहा आदी नी मनोगत व्यक्त केले . या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक निवास येथील ज्येष्ठा साठी भारतीय बनावट चा फ्रीज भेट देण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील तर आभार अभिजित जगताप यांनी मानले.