दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने ‘कारगिल विजय दिन’ कार्यक्रम घेण्यात आला.सकाळी राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन केले. कारगिल युद्धामध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी उभारलेल्या कारगिल शहीद स्मारक उद्यान येथे महाविद्यालयाच्या एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट प्राध्यापक केशव पवार यांनी छात्र निकांना,कारगिल युद्धामधे जवानांनी केलेले बलिदान, शौर्य आणि पराक्रमाची आठवण करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठल शिवणकर साहेबानी शहीद जवानांना अभिवादन करून छात्र सैनिकांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, ज्याप्रमाणे सैनिक मातृभूमीचे रक्षण करतात त्याचप्रमाणे वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी मदत करतात म्हणून शहीद जवानांच्या आठवणी सोबतच ‘पर्यावरण संवर्धन’ हा संदेश विद्यार्थ्यांनी मनात घेतला पाहिजे. कारगिलच्या युद्धात देशाचे रक्षण करण्यासाठी जे सैनिक शहीद झाले त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन अधिक निष्ठेने देशसेवा करत राहिले पाहिजे.’’
कारगिल राष्ट्रीय छात्र सेना विभागात पार पडलेल्या एनसीसी मिलिटरी सायन्स विषयाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत कारगिल शहीद जवानांना मेजर, संजय चौधरी, लेफ्टनंट अंकुश माळी, राजशेखर नीलोलू, सुशांत पोळ, जीवन रक्षक दिनकर कांबळे यांनी शहीद कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करून अभ्यास मंडळाचे काम पूर्ण केले. एन.सी.सी ऑफिसर, लेफ्टनंट केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सिनियर अंडर ऑफिसर किशोर पंडित, ज्युनिअर अंडर ऑफिसर अनिकेत ननवरे,सिनियर अंडर ऑफिसर प्रियांका चव्हाण सार्जंट लक्ष्मी फडतरे यांनी कार्यकर्माचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.